जळगाव

  ?जळगाव
महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
गुणक: 21.016775.5667
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
• उंची

• २०९ m (६८६ ft)
जिल्हाजळगाव
लोकसंख्या३८४ (२०12)
कोड
• दूरध्वनी
• आरटीओ कोड

• +91(257)
• MH 19
जळगाव शहर महाराष्ट्र राज्यातील एक मोठे शहर आहे. जळगाव जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेले जळगाव शहर महत्त्वाचे कृषी व्यापार केंद्र आहे. कापूस, खाद्य तेले, केळी इ. बाजारपेठा येथे असून जळगाव सोन्याची बाजारपेठ म्हणून नावाजलेले आहे. येथील सोने शुद्धतेबद्दल प्रसिद्ध आहे. जळगाव शहरात ठिबक-सिंचन, पाण्याचे पाईप व कापड इत्यादी उद्योग आहेत.
जळगाव शहरात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जैन ठिबक सिंचन प्रकल्प या प्रसिद्ध संस्था आहेत.

नाव

जळगाव

इतिहास

जळगावची स्थापना मराठ्यांनी केली. सरदार तुळाजीराव भोइटे यांनी या गावाची स्थापना केली. सरदार तुळाजीराव भोइटे हे सातारयाचे संस्थानिक होते. भोईटे कुटुंबाचे पूर्वज दुर्गोजीराव भोईटे, छत्रपती शाहू महाराजांचे निष्ठावंत असल्याकारणाने महाराजांकडून त्यांना नशिराबाद आणि जवळील प्रांत अनुदान म्हणून मिळाले. भोईटे बरयाच काळापर्यंत जळगावचे राज्यकर्ते राहिले आणि त्यांनी जळगाव येथे ऐक वाडा बांधला, आज त्या वाडयाला भोईटे गादी असे ओळखले जाते.

मराठा साम्राज्य

स्वातंत्र्ययुद्ध

भूगोल

जळगाव समुद्र सपाटी पासून साधारणतः २०९ मीटर उंचीवर आहे. गिरणा नदी शहराच्या पश्चिमी भागातून वाहते.

काव्य रत्नावली चौक

जळगाव जिल्ह्याचा नकाशा

पेठा

उपनगरे

  • शनी पेठ
  • जुने जळगाव
  • नवी पेठ
  • रामपेठ
  • शाहू नगर
  • महाबळ
  • जिल्हा पेठ
  • बळीराम पेठ

हवामान

जैवविविधता

अर्थकारण

बाजारपेठ

जळगाव जिल्ह्या मधील यावल तालुक्यातील साकळी हे सुमारे ८५०० लोकवस्तीचे गाव असून या गावाला लागून एकुण ६ छोटी गावे आहेत.सदर गावामध्ये भवानी माता मंदिर परिसरात आठवडे बाजार दर रविवारी असतो.सदिरील बाजारासाठी आजू बाजूच्या गावातील लोक हे भाजीपाला,दाड,कडधान्ये,इतर गृह पयोगी वस्तूंची खरेदी साठी येत असतात.परिसरात ह्या बाजाराला सर्वसाधारण जनतेच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे.

प्रशासन

नागरी प्रशासन

जळगाव शहर हे महानगर असून येथील प्रशासकीय कारभार महानगर पालिके मार्फत चालविला जातो. आशिया खंडात एकमेव अशी १७ माजली प्रशासकीय इमारत असलेले जळगाव हे एकमेव शहर आहे.

जिल्हा प्रशासन

अधिक माहितीसाठी पहा - जळगाव जिल्हा
जळगाव शहर महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यात आहे. जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी हा असतो व त्याचे काम सातबारा, जमीनजुमल्याच्या नोंदी ठेवणे, राज्य सरकारकरिता सारावसुली, करवसुली व निवडणुकांचे व्यवस्थापन करणे हे असते.

महानगर पोलीस यंत्रणा

राज्याच्या गृह मंत्रालयाने नियुक्त केलेला एक आय. पी. एस. अधिकारी हा जळगाव पोलीस खात्याचा मुख्य आहे. त्यामुळे इथली पोलीसव्यवस्था महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत ये्ते.

वाहतूक व्यवस्था

लोहमार्ग

जळगाव शहर हे एक जिल्ह्यातले महत्वाचे रेल्वे जंक्शन असून ते भारतातल्या मुंबईनागपूरनवी दिल्लीकोलकाताअलाहाबादचेन्नई यासारख्या मोठ्या शहरांसोबत रेल्वेमार्गाने जोडले गेले आहे. तसेच जिल्ह्यातले भुसावळचाळीसगाव व पाचोरा हीही रेल्वे जंक्शने आहेत, त्यांपैकी भुसावळ हे महाराष्ट्रातले मोठे जंक्शन म्हणून ओळखले जाते.

हवाई मार्ग

जळगाव शहरात नुकतेच विमानतळ उभारण्यात आले आहे. परंतु अजून ते बाल्य आवस्तेत असून त्याचा विकास बाकी आहे.

रस्ते[संपादन]

__________________________________________________________________________________________________________________________________________________________________

पोलीस स्टेशन 

पत्ता :
संपर्क :

तहसील ऑफिस 

पत्ता :
संपर्क :

महानगर पालिका

पत्ता :
संपर्क : 

बस स्टॅंड

पत्ता :
संपर्क :

रेल्वे स्टेशन

पत्ता :
संपर्क :

फायर ब्रिगेड

पत्ता :
संपर्क :

दवाखाने

पत्ता :
संपर्क :

शाळा

पत्ता :
संपर्क :

महाविद्यालये

पत्ता :
संपर्क :