चाळीसगाव

चाळीसगाव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे.
'
शहरचाळीसगाव
जिल्हाजळगाव
राज्यमहाराष्ट्र
जनगणना वर्षइ.स. २००१
लोकसंख्या--
दूरध्वनी कोड०२५८९
पोस्ट्ल कोड४२४१०१
आर.टी.ओ कोडMH-१९
चाळीसगाव शहराचे दोन मुख्य भाग आहेत - जुने शहर व नवे शहर. या दोन्हीच्या मधून डोंगरी नदी वाहते.

दळण वळण

चाळीसगाव हे लोहमार्ग व राज्य महामार्गांनी इतर शहरांशी जोडलेले आहे. लोहमार्गावरील भुसावळनजीक असलेले हे मध्य रेल्वेवरील मुंबई-दिल्ली मार्गावरील एक जंक्शन स्टेशन आहे. चाळीसगाववरून धुळे येथे जाण्यासाठी रेल्वेचा फाटा फुटतो. चाळीसगाव हे एक महत्त्वाचे स्थानक असल्याने येथे बहुतेक सर्व रेल्वेगाड्या थांबतात. मुंबई व पुणे येथून अंदाजे सात तासांच्या अंतरावर आहेत. जळगावनासिकऔरंगाबाद व धुळे ही शहरे येथून साधारणतः एकाच अंतरावर आहेत.

भूगोल

चाळीसगाव महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात नैर्ऋत्य दिशेस आहे. चाळीसगावच्या उत्तरेस धुळे जिल्हा व पारोळा तालुका, पश्चिमेस नासिक जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा तर पूर्वेस पाचोरा व भडगाव तालुके आहेत. चाळीसगाव डोंगरी व तित्तूर या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. या नद्या पुढे गिरणाला मिळतात. गिरणा पुढे अरबी समुद्रास मिळणाऱ्या तापी नदीस मिळते.

पर्यटन

चाळीसगावच्या दक्षिणेस सातमाळा नावाची डोंगराची रांग आहे. अजिंठा व वेरूळ ही चाळीसगावच्या जवळची प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. अन्य पर्यटनस्थळांत पाटणादेवी व पितळखोरे लेणी ही वाखाणण्याजोगी आहेत.व्यक्तिगतमत ] पाटणादेवी मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैली शैलीत मोडते. तसेच चाळीसगाव शहराच्या मध्यवर्ती असलेले सौंदर्यशैलीत भर घालणारा, हिंदू मुसलमान एकीचे प्रेम जपणारा व बंधुभावाची शिकवण देणारा पिरमुसा कादरीबाबाचा दर्गा येथे आहे. तरवाडे बु. येथे प्रसिद्धव्यक्तिगतमत ] साईबाबा मंदीर आहे. ते चाळीसगाव येथुन ७ किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदीर अतिशय सुंदर व रेखीव आहे.व्यक्तिगतमत ] या ठिकाणी दर वर्षास मंदीराचा वर्धापन सोहळा होतो. त्यावेळी या ठिकाणी हजारो भाविक भेट देतात.

चाळीसगाव तालुक्यातील गावे

मेहुणबारेपिलखोड,खडकी (चाळीसगाव तालुका)हिरापूरतळेगावरोहिणीपिंपळगाव (राजदेहरे)राजदेर तांडागंगाश्रमहिंगणेशिंदीघोडेगावओढरेजुनपाणीपाटणादेवीवालझिरीपिंपरखेडलांबे वडगाव,कजगावकरगावभोरस , चीर्फळटाकळी (प्र. दे.)हातगावबेलदारवाडीशामवाडीपातोंडानगरदेवळाकालीमठउंबरखेडतांबोळेतरवाडेबहाळदहीवडवाघळीसायगावपिंपळखेडरांजणगाव

उद्योग

इथे कृषी उत्पन्नावर आधारित बेलगंगा साखर कारखाना, चाळीसगाव कापड गिरणी, तेल व विड्यांचे कारखाने इ. इतर उद्योगांना चालना देण्याकरता इथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे चाळीसगाव उद्योग क्षेत्र आहे.

कृषी

चाळीसगाव व जवळपासच्या भागात शेती हा मुख्य धंदा आहे. ऊस, कपाशी व केळी ही मुख्य रोख पिके आहेत. येथे भुईमूगाचीही लागवड होते. ज्वारीबाजरी व गहू ही धान्येही घेतली जातात. बहुतांश शेती जिरायती आहे.

प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

__________________________________________________________________________________________________________________________________________________________________